“मार्टी”सह अल्पसंख्यांक विकास योजना तातडीने सुरू करा ; महा मायनॉरिटी एनजीओ फोरमची मागणी

0
WhatsApp Image 2026-05-20 at 9.04.27 AM

मिरज (प्रतिनिधी)
उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेऊन मिरज येथील सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांनी महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. महा मायनॉरिटी एनजीओ फोरमच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात “मार्टी” प्रकल्पासह अल्पसंख्यांक विकासाच्या विविध योजना तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात जिल्हा अल्पसंख्यांक विकास कक्षासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रलंबित निधीचे वितरण, २०२६-२७ साठी ३० हजार कोटींचे बजेट, प्रभावी नवीन योजना, जिल्हास्तरीय समन्वय समित्या आणि अल्पसंख्यांक आयोग अधिक सक्षम करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. तसेच विनाटेंडर मंजूर कौशल्य विकास कामांची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली. यावेळी जाकीर शिकलगार, डॉ. अस्लम बारी, मो. मोहसीन शेख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. संबंधित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्याची माहिती जहीर मुजावर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *