सांगलीचा कायापालट करणार; कोट्यवधींच्या रस्ते विकास कामांचे आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन

0
IMG-20260521-WA0380

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळत असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. प्रभाग क्र.८ मधील स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध रस्ते विकास कामांचे भूमीपूजन तसेच ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने’अंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील चैतन्यनगर औद्योगिक वसाहतीसमोरील काँक्रिट रस्त्याचे लोकार्पण आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, सांगली शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास करणे हे आमचे प्रमुख ध्येय असून नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते, पाणीपुरवठा, गटारी आणि इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. या कामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत होत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ०८ मधील कुपवाड ढवळेश्वर प्लॉट येथील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ७.३१ लाख रुपये, विनायक नगर गल्ली क्रमांक ०१ येथील अंतर्गत रस्ता विकासासाठी १६.८७ लाख रुपये, विजयनगर पश्चिम शिव मंदिर परिसरातील दक्षिण बाजूच्या रस्त्यासाठी २४.८२ लाख रुपये तसेच प्रभाग क्रमांक ११ ड मधील चैतन्यनगर औद्योगिक वसाहतीसमोरील काँक्रिट रस्त्यासाठी ४१.९३ लाख रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ व लोकार्पण पार पडले.

नवीन आणि दर्जेदार रस्ते विकास कामांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार असून नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे आभार मानले. यावेळी मनपा स्थायी समिती सभापती अतुल माने, भाजपा सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजीत पाटील, नगरसेविका योगिताताई राठोड, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, मिनाक्षीताई पाटील, नगरसेवक दीपक वायदंडे, माजी महापौर कांचनताई कांबळे, माजी नगरसेवक मनोज सरगर, महेश निर्मळे, सुनील भोसले, सदाशिव पाटील, अजित दुधाळ, आकाश वळकुंडे, प्रसाद वळकुंडे, संजय कांबळे, महेश साळुंखे, संतोष रुपनर, रवींद्र माळी, दीपक शिंदे, अंकुश खरात, रमेश बद्रे, बापू डोंबाळे, समीर मुल्ला, ऋषिकेश वायदंडे यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *