कोरगांवकर हायस्कूलमध्ये साने गुरुजींना अभिवादन

0

कोरगांवकर हायस्कूलमध्ये साने गुरुजींना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी)  आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलमध्ये महाराष्ट्रमाऊली साने गुरुजी यांच्या स्मृतिदिना निमित्त विविध उपक्रमाद्वारे त्यांच्या स्मृतींना उजाळा देवून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते प्रभूप्रसाद रेळेकर यांनी सानेगुरुजींच्या जीवन संघर्षाचे प्रसंग कथन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांना “खरा तो एकचि धर्म” या प्रार्थनेचे सार विशद केले. इयत्ता दहावी ब च्या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांचे हस्ते भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. वर्गशिक्षक बाबासाहेब डोणे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संकपाळ यांनी आभार प्रदर्शन केले.

      प्रारंभी प्रभूप्रसाद रेळेकर यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दानशूर प्रभाकरपंत कोरगांवकर यांच्या अर्ध पुतळ्यास मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी पुष्पहार घातला. हायस्कूलने ५१ व्या वर्षात गुणवत्तापूर्ण पदार्पण केल्याने कौतुकासाठी माजी मुख्याध्यापक अशोक शेवडे, अपर्णा शेवडे तसेच माजी विद्यार्थी प्रशांत गिरी, गणेश गुरव, ॲडव्होकेट अरुण यादव, मनोज माळी यांनी भेट देवून मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांना सरस्वतीची मूर्ती प्रदान केली. शाळेचे माजी उपमुख्याध्यापक विनय पाटगांवकर यांनीही सदिच्छा भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

     यावेळी पर्यवेक्षिका सुरेखा पोवार, साने गुरुजी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सारिका ढेरे, इंद्रायणी पाटील, विद्या बाचणकर, शीतल गणेशा चार्य, राजेंद्र कुंभार, सुभाष बेलवळेकर, सतिश नंदनवार, सलिम मणियार आदी मान्यवर उपस्थित होते. 

       हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या भित्तीपत्रिकेचे अनावरण करताना मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सुरेखा पोवार, प्रभूप्रसाद रेळेकर, राजाराम संकपाळ आदी मान्यवरांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *