राजेंद्र वड्डर-पवार यांनी घेतली मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट
निपाणी,ता.11(प्रतिनिधी)-
मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नूतन मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सतीश जारकीहोळी यांची फेरनिवड होऊन शपथ घेतल्यानंतर भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर पवार यांनी भेट घेतली. व मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी राजकीय चर्चा केली.
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या यमकनमर्डी येथील त्यांच्या कार्यालयाला भेट देऊन कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून फेर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याच वेळी निपाणी तालुक्यातील विविध विषयावरही चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर गेल्या तीन वर्षापासून कर्नाटक राज्यातील सर्व नागरिकांना वेगवेगळ्या योजनेतून विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.गॅरंटी योजनेतून महिलांच्यासाठी व पदवीधर विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक योजना राबवून ते पूर्ण करण्यात येत आहेत. निपाणी तालुक्यात काँग्रेस पक्षाचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी कोणकोणते उपाययोजना राबवावे याबाबत मंत्री जारकीहोळी यांच्याशी राजेंद्र वडर पवार यांनी चर्चा केली.मंत्री सतीश जारकीहोळी हे निपाणी, चिकोडी तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना निपाणी तालुक्यात आणखीन कोणत्या पद्धतीने काँग्रेस पक्षाचे बांधणी करावी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नाइन इव्ही हे आधुनिक वाहन राजेंद्र वडर पवार यांनी घेतले आहे.प्रदूषण आणि इंधन वाचवण्याच्या दृष्टीने सदर वाहन उपयोगी ठरणार असून या नवीन घेतलेल्या वाहनातून मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वतः बसून फेरफटका मारला.याशिवाय भोज, बेडकीहाळ, गळतगा, अकोळ भागातील कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्ष याबद्दल सविस्तर चर्चा करून येत्या काही दिवसांमध्ये या भागात मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वतः येऊन कार्यकर्त्यांना भेटण्याचे आश्वासन दिले. यावेळी राजेंद्र वडर पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


