टाकळी उपसरपंचपदी भाजपच्या कल्पना कदम ; आ. सुरेश खाडे यांच्याकडून सत्कार
मिरज (प्रतिनिधी)
मिरज तालुक्यातील टाकळी गावच्या उपसरपंचपदी भाजप प्रणित टाकळी सुभाषनगर ग्रामविकास पॅनलच्या सदस्या कल्पना दत्तात्रय कदम यांची निवड झाली आहे. माजी मंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती सत्ताधारी गटाच्या पदाधिकारी, नेत्यांनी दिली.
उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य अनिल शिरसाठ, माजी सरपंच आगस्ट कोरे, रवींद्र मोहिते, अश्विनी भोसले, अभिजीत पाटील, विमल वाघमारे, रूपाली लोखंडे, पंकज शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, संतोष भोसले, मुसा गोदड, सदाशिव पुजारी, प्रवीण कोरे, दिग्विजय कदम यानी प्रयत्न केले.
निवडीनंतर उपसरपंच कल्पना कदम यांचा आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी सुमनताई खाडे यांच्यासह भाजपाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी उपसरपंच कदम यांना शुभेछा देऊन अभिनंदन केले. ग्रामस्थांच्या समस्या व मागण्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी, तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसरपंच कल्पना कदम यांनी सांगितले. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी व सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.


