डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स चे युवा महोत्सवांमध्ये यश

0
डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स चे यश

देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर

कोल्हापूर. (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ आयोजित ४६ वा मध्यवर्ती युवा महोत्सव दि. ६ ते ९ ऑक्टोबर रोजी फलटण येथे पार पडला. यामध्ये देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूरच्या सांस्कृतिक विभागाने विविध कलाप्रकारात यश मिळवले. यामध्ये नकला व वेस्टर्न सोलो वादन-प्रथम क्रमांक, शास्त्रीय सुरुवाद्य-दुसरा क्रमांक, भीतीचित्र व वेस्टर्न सोलो- तृतीय क्रमांक, वेस्टर्न समूहगीत व भारतीय समूहगीत-चौथा क्रमांक तसेच एकपात्री अभिनय- पाचवा क्रमांक असे सांघिक व वैयक्तिक कलाप्रकारात यश प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

      विद्यार्थी कलाकारांना प्रेरणा व मार्गदर्शन कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य अॅड. वैभव पेडणेकर, अॅड. अमित बाडकर, प्राचार्य डॉ. वर्षा मैंदर्गी, उपप्राचार्य कॅप्टन डॉ. आर. एस. नाईक, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.के जी कांबळे, प्रा. प्रविण सोरटे, प्रा. प्रतीक भस्मे, प्रा. प्रथमेश पोतदार, विशाल चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *