केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांस्कृतिक महोत्सव उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवारी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, वेशभूषा, कागदकला, हस्तकला, गरबा, दांडिया, वादविवाद आणि पाककला अशा विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आकर्षक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता, वक्तृत्वकला आणि कलात्मकतेचे दर्शन घडवले.
या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावनेला प्रोत्साहन मिळाले. यावेळी शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त ॲड. वीरेंद्र पाटील आणि समन्वयक सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयिका अश्विनी येळकर आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पालकांनीही उपक्रमाचे कौतुक केले.


