देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाच्या बीबीए विभागातर्फे ‘AURA 2026’ फ्रेशर्स वीक उत्साहात संपन्न
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स
कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बीबीए विभागातर्फे आयोजित ‘AURA 2026’ फ्रेशर्स वीक उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात ट्विन्स डे, मिसमॅच डे, डिबेट, ॲड-मॅड शो, क्विझ, बॉलिवूड डे यांसह विविध मनोरंजक स्पर्धांनी रंगत आणली.
नवागत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, मैत्री आणि सांघिक भावना वाढविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विभागप्रमुख डॉ. सीमा बेनाडे यांच्या नियोजनाखाली प्राध्यापकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
000000


