आविष्कार स्पर्धेत डी आर के कॉलेजच्या प्राजक्ता रणदिवे हिचे यश
कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), कोल्हापूर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा २०२६–२७ मध्ये कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), कोल्हापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता रणदिवे हिने वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा या विद्याशाखेतून द्वितीय क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा रोवला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विविध विद्याशाखा अंतर्गत एकूण १२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन विषयाचे सादरीकरण करून आपल्या कल्पकतेची, अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाची आणि संशोधन क्षमतेचे ओळख करून दिली. प्राजक्ता रणदिवे हिने मिळविलेल्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक वाटचालीला विशेष बळ मिळाले आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या आदरणीय अध्यक्षा रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ .प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ . सौ. वर्षा मैंदर्गी, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. नाईक, आविष्कार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. एस. देसाई, अविष्कार समन्वयक डॉ. पी. एन. देवळी तसेच संबंधित प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
आविष्कार स्पर्धेतील या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होण्यास आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ मिळण्यास मदत झाली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १२ विद्यार्थ्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही संशोधन, नवोपक्रम आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केल्या.
00000


