वाचन जगण्याचे नवे भान देते : नीलम माणगावे

0
WhatsApp Image 2026-10-15 at 4.49.08 PM

रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज

कोल्हापूर (प्रतिनिधी) :   वाचन जगण्याचे भान देते. जग फिरवून आणते. वाचन प्रसंगी गोठवते. आत्ममग्न बनवते आपल्या भवतालाकडे बघण्याची नवी दृष्टी देते. म्हणून जगण्याकडे बघण्याची दृष्टी व्यापक व्हायची असल्यास त्यासाठी वाचन आवश्यक असल्याचे मत जेष्ठ लेखिका नीलम माणगावे यांनी व्यक्त केले. त्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूरचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वाचन आपल्याला काय देते ? ह्या चर्चासत्रात बोलत होत्या. ह्या सत्रास नाटककार हिमांशु स्मार्त हे साधनव्यक्ती म्हणून उपस्थित होते. तर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाच्या  उपप्राचार्या डॉ. सुप्रिया खोले होत्या.

                   माणगावे  त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये वाचनाने छोट्या छोट्या संकल्पनांची मांडणी केली. डॉ. हिमांशु स्मार्त यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये वाचनामुळे माणसाची विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि आकलनक्षमतेवर नेमका काय परिणाम होते हे सोदाहरण सांगितले. आज समाजमाध्यमामुळे मानवी मेंदू ड्रेड होण्याचा धोका अधिक वाढला आहे. यामुळे भविष्यात व्यक्ती गुलाम म्हणून जगण्याची शक्यता अधिक वाढली आहे. म्हणून आपण वाचनाकडे वळायला हवं असे मत त्यांनी व्यक्त केले.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया खोले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासणे आवश्यक असल्याचे मत मांडले. मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष होऊ नये. तसेच विविध साहित्यप्रकारांचे वाचन केल्याने भाषिक कौशल्ये आणि अभिव्यक्तीक्षमता समृद्ध होते. वाचनामुळे जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन प्राप्त होतो, असे  स्पष्ट केले. ह्या कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने डॉ. कलाम यांच्या जीवन आणि कार्याचे दर्शन घडविण्यारे भित्तीपत्रक तयार केले होते. याबरोबरच  दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन भरविले होते. त्याचे उद्घाटन मा. संभाजी पाटील व श्रीमती नीलम माणगावे हस्ते करण्यात आले. 

     या चर्चासत्रास उपप्राचार्या, प्रो. डॉ. एस. पी. खोले, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. सर्जेराव पद्माकर, सर्व विभागाचे विभागप्रमुख, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचे स्वागत  डॉ. बी. एम. मगदूम यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. जे. ए. कांबळे व डॉ. एस. पी. रोटे  यांनी व आभारप्रदर्शन डॉ. आर. एस. राणेसंकपाळ  यांनी केले.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *