पदवीधर आणि शिक्षक मतदान संदर्भात जनजागृती आवश्यक : डॉ. वर्षा मैंदर्गी
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रत्येक सहा वर्षानंतर होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदार म्हणून क्षमतेपेक्षा कमी नोंदणी झालेल्या आहे त्यामुळे या संदर्भात जनजागृती आवश्यक आहे असे प्रतिपादन देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी केले. त्या महाविद्यालयातर्फे आयोजित पदवीधर आणि शिक्षक मतदान जागृती संदर्भात काढलेल्या रॅलीमध्ये बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या,की पदवीधर आणि शिक्षक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींची आवश्यकता असते आणि हे लोकप्रतिनिधी शिक्षक आणि पदवीधर आपल्या मधूनच निवडत असतात त्यामुळे या संदर्भात सर्वांच्या मध्ये जनजागृती आवश्यक आहे.
या रॅलीचा मार्ग देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,भवानी मंडप मार्गे पुन्हा महाविद्यालयाचा कॅम्पस असा होता या रॅलीला कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ .प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर, यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी उपप्राचार्य डॉ.आर.एस.नाईक एनएसएस समन्वयक डॉ. ए .एस.बन्ने, डॉ.एम.एन.मुजावर प्रा.कुबेर दिंडे डॉ.वैशाली जगताप,यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, 5 आणि 6 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कॅडेट असे एकूण 130 विद्यार्थी उपस्थित होते.
00000


