आयुष कणसे याचे कराटे स्पर्धेत यश
आयुष अमर कणसे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कदमवाडी रोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचा इयत्ता 11 वी सायन्स मधील विद्यार्थी-खेळाडू आयुष अमर कणसे याने रत्नागिरी येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय 19 वर्षाखालील कराटे स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन केला आहे.
त्याच्या या कामगिरीबद्धल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई), रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागीय अध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन संगीता पाटील, सदस्य प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.डी.आर.भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डी.एम.गायकवाड, उपप्राचार्या सौ.एल.बी. चव्हाण यांनी अभिनंदन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अभिनंदन कौलगे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.


