मिरजेत वॉचमन काकांना विद्यार्थ्यांची दिवाळी भेट ; चाँद उर्दू हायस्कूलचा अनोखा उपक्रम

0
WhatsApp Image 2026-11-04 at 12.49.21 PM (1)

मिरज (प्रतिनिधी)
चाँद उर्दू हायस्कूल, मिरज येथे दिवाळी सुट्टीपूर्वी शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सहभागातून कृतज्ञतेचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या वॉचमन काका अर्थात लक्ष्मण भोरे यांना विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेटमनीमधून स्वेच्छेने रक्कम जमा करुन मिठाई भेट दिली. तसेच शाळेच्या एका सदस्याकडून त्यांना नवीन ड्रेस भेट देण्यात आला.

विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये वडिलधाऱ्यांचा आदर, प्रत्येकाच्या कामाचे महत्त्व, कृतज्ञता आणि माणुसकीचे संस्कार रुजावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. मूल्यशिक्षण केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून रुजते, असा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील शिक्षक व पालकांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *