ओंकार वडणे याची जलतरण स्पर्धेसाठी निवड
ओंकार बाळासाहेब वडणे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कदमवाडी रोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचा इयत्ता 12 वी कॉमर्स मधील विद्यार्थी-खेळाडू व राष्ट्रीय जलतरणपट्टू सागर प्रशांत पाटील जलतरण तलाव येथे सराव करणारा जलतरणपट्टू ओंकार बाळासाहेब वडणे याने सातारा येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय 19 वर्षाखालील जलतरण स्पर्धेतील 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात दुसरा तर 50 मी. बॅकस्ट्रोक स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन केला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याच्या या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई), रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागीय अध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन संगीता पाटील, सदस्य प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.डी.आर. भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डी.एम.गायकवाड, उपप्राचार्या सौ.एल.बी.चव्हाण यांनी अभिनंदन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अभिनंदन कौलगे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.


