सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारास काँग्रेसने परत पक्षात घेऊ नये – पृथ्वीराज पाटील

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिचि नवनिर्वाचित अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक काल मुंबईत घेतली. यामध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली अशा उमेदवारांना त्यांना पक्षाने 6 वर्ष करता निलंबित केले आहे अशांना पक्षात पुन्हा थारा देऊ नये, अशी आग्रही भूमिका सर्वच जिल्हाध्यक्षांनी मांडली.
सांगली विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत पृथ्वीराज पाटील यांनी श्रीमती जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती आणि ती मुद्दाम भाजपच्या फायद्यासाठी केली होती, त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, अशी आग्रही त्यांनी बैठकीत मांडली. तसेच काँग्रेस बंडखोर उमेदवाराच्या बाजूने उभे राहिलेले काही माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताववावर माजी प्रांताध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही याबद्दल खेद व्यक्त केला. पक्ष हितासाठी या बंडखोर समर्थकांवर देखील कारवाई लवकर करण्याची मागणी केले. श्रीमती पाटील यांना काँग्रेसमध्ये परत घेण्याच्या प्रयत्नांना या बैठकीत धक्का देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटील यांनी केला. ज्यांनी काँग्रेसच्या विचाराशी आणि काँग्रेसचे उमेदवाराशी, काँग्रेसच्या भूमिकेशी प्रतारणा केली त्यांचा पुन्हा सन्मान केला तर काँग्रेस कशी वाढणार असा सवाल देखील त्यांनी केला.