जीएसटी अभय योजनेचा लाभ घ्यावा ; केंद्रीय जीएसटी अपर आयुक्त प्रसाद गोरसे यांचे आवाहन

मिरज येथे चर्चासत्र संपन्न
मिरज (प्रतिनिधी)
जीएसटी व्याज व दंड माफीसाठीची अभय योजना सध्या सुरू असून 31 मार्च 2025 पर्यंत सदर योजनेखाली कर भरणा व 30 जून 2025 पर्यंत सदर योजनेखाली अर्ज सादर करून करदाते यांनी आपले कर विवाद संपुष्टात आणावेत असे प्रतिपादन केंद्रीय जीएसटी, कोल्हापूर अन्वेषण विभागाचे अपर आयुक्त प्रसाद गोरसे यांनी केले. ते सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीने मिरज येथे आयोजित चर्चासत्रात बोलत होते.
यावेळी केंद्रीय जीएसटी सांगली विभागाचे सहाय्यक आयुक्त यू. के. सतीश, कोल्हापूर अन्वेषण विभागाचे सहाय्यक आयुक्त भूपेंद्र सिंह पॉल तसेच असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, जीएसटी अधीक्षक सागर कुलकर्णी, हिमेश गर्ग, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गोरसे पुढे म्हणाले कि, जीएसटी कायदा कलम 73 तसेच कलम 16(4) संबंधी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसा तसेच मागणी आदेश यासाठी ही योजना असून करदात्यांनी यास प्रतिसाद देणे आवश्यक आहे. कर सल्लागार यांनी यास प्रसिद्धी द्यावी असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी
यावेळी बोलताना यु. के. सतीश यांनी अर्ज ऑनलाईन करताना कोणत्याही अडचणी येत असतील तर कार्यालयातील अधिकारी यासाठी उपलब्ध आहेत असे सांगितले. हिमांशु गर्ग यांनी योजनेचे तपशीलवार विवेचन केले. राजेंद्र मेढेकर यांनी कर दात्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षल खरे, सचिव मनोज पाटील खजिनदार उद्धव दळवी, ज्येष्ठ संचालक .के.एस.भंडारे, विजय भोसले, जयंत माने, अनिल पाटील यांचे सह उद्योजक व स्टाफ उपस्थित होता. संयोजन व्यवस्थापक गणेश निकम यांनी केले.