मिरजेत आधार सेवा फाऊंडेशनचा गरजू विद्यार्थिनींना आधार ; सायकल व सॅकचे वाटप

मिरज (प्रतिनिधी)

मिरजेतील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या “आधार सेवा फौंडेशन” ने अत्यंत गरजू विद्यार्थिनींना सॅक आणि सायकलींचे वाटप करून शैक्षणिक आधार देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. मिरज येथील ज्युबिली कन्या शाळेतील २५ विद्यार्थिनींना दप्तर (सॅक) व दोन विद्यार्थिनींना नवीन सायकली प्रदान करण्यात आल्या.

गेली १५ वर्षे विविध सामाजिक कार्यातून गरजूना आधार देणाऱ्या आधार सेवा फौंडेशनचे कार्य दिवसेंदिवस उंचावत चालले आहे व लवकरच एका अपंग तरुणास खास व्यवसायासाठी बनविलेली सुरक्षित अशी बॅटरीवरील तीनचाकी संस्थेच्या वतीने देण्यात येणार असल्याचे आधार सेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन वाटवे यांनी सांगितले. कन्या शाळेच्या दोन विद्यार्थिनींना सायकली व २५ विद्यार्थिनींना सॅक देण्याचा कार्यक्रम संस्थेच्या कार्यालयात नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक मकरंद देशपांडे, संस्थेचे आधारस्तंभ विवेकराव लेले व सौ. वासंती लेले, अध्यक्ष मोहन वाटवे, संस्थेचे कोषाध्यक्ष विलासराव गोखले, सचिव प्रसाद शानभाग, हिमांशू लेले, सौ. स्नेहा शानभाग, आमोद शानभाग, डॉ. संदीप देवल, किशोर लागू, योगेश कुलथे, दिलीप जोशी, महेश क्षीरसागर, मिलिंद भिडे, संजय पवार, चेतन कुलकर्णी, मनोज यादव, मल्लिकार्जुन खिचडे, शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते.

About The Author