मिरजेत सामाजिक कार्यकर्ते मितेश पवार यांच्यातर्फे नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

0
WhatsApp Image 2025-03-30 at 7.02.04 AM

मिरज (प्रतिनिधी)

भाजप वैद्यकीय आघाडीचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मितेश पवार यांच्यातर्फे नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विविध प्रकारचे ऑनलाइन फॉर्म भरणे, विविध प्रकारचे दाखले तसेच अन्य ऑनलाईन कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये या हेतूने गुरुदेव ऑनलाईन सर्व्हिसेस या केंद्राची सुरुवात त्यांनी केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते या केंद्राचे गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद्घाटन झाले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, सामाजिक कार्यकर्ते मितेश पवार, जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे, भाजपचे शितल पाटोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी या केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी येथे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. मितेश पवार यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी यांनी दूरध्वनीद्वारे मितेश पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अरुण पवार, मिलिंद पवार, महेश भोकरे, जयसिंग पाटील, अक्षय देवाने, नितीन चौगुले, दिलीप देवल, नितीन सावंत, मनोज कांबळे, गजानन बाबर, राकेश आढळी, नंदकुमार गवळी, रामचंद्र पवार, नदाफ सर, रमेश पाटील, भीमराव बनसोडे, सुरेश सातपुते, श्रीनिवास जाधव भरत तन्ना, अनिल कोळसे पाटील, युसुफ मंगळवारे, विनायक पवार, आदित्य पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *