स्वस्थियोग प्रतिष्ठान मिरजतर्फे योगासन वर्गाची होणार सुरुवात

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेतील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. जी.एस.कुलकर्णी यांच्या ” स्वस्थियोग प्रतिष्ठान ” च्या वतीने या महिन्यात योगासन वर्ग सुरु करण्यात येत आहे. स्वस्थियोग प्रतिष्ठानच्या ” करुणावधान हॉल “, दत्त कॉलनी, मालगाव रस्ता, मिरज येथे हा योग वर्ग सुरु होत असून नावाजलेल्या लोकप्रिय योग प्रशिक्षिका श्रीमती भारती आरळी यांचे योग प्रशिक्षण दररोज या वर्गास लाभणार आहे.
दररोज सायंकाळी साडेपाच वाजता प्रशिक्षण सुरू होणार असून या वर्गात ५० व्यक्तींना प्रवेश असेल. यामधील प्रथम २५ नोंदणी करणाऱ्या व्यक्तींना तीन महिन्यासाठी निशुल्क सेवा असेल व २५ नंतर नोंदणी करणाऱ्या व्यक्तींना प्रति महिना दोनशे रुपये शुल्क असेल. इच्छुकांनी आपल्या नावाच्या नोंदणीसाठी शेखर जगताप (8605856339), आशुतोष कुलकर्णी (9527614314), मोहन वाटवे (9421219893) व मिलिंद भिडे (9372121314) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन स्वस्थियोग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.