डॉ. मनाली कोळेकर हिचे यश प्रेरणादायी व आदर्शवत – मितेश पवार

0
WhatsApp Image 2025-04-14 at 10.36.47 AM

बीएचएमएस परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सत्कार

मिरज (प्रतिनिधी)

जेजे मगदूम कॉलेजच्या डॉ. मनाली महेश कोळेकर हिने बीएचएमएस परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून नाव उज्वल केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मनाली हिचे यश नक्कीच प्रेरणादायी व आदर्शवत असल्याचे भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र वैद्यकीय आघाडी संयोजक मितेश पवार म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तिचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी अरुण पवार, प्रा. युसुफ मंगळवारे, आदर्श शिक्षक नचिकेत भोई, रामचंद्र पवार, उद्योजक विनायक यादव, अक्षय देवगन, नितीन सावंत, नदाफ सर, रमेश पाटील, महेश भोकरे, बाळू कोळेकर, दीपक लांडगे, शिवाजी मोरे तसेच आई नीलम कोळेकर उपस्थित होते.

तुटपुंज्या शैक्षणिक सुविधा, आर्थिक अडचण यासह विविध प्रतिकूल बाबींवर मात करत मनालीने हे यश मिळवलं आहे. ती आजच्या तरुण-तरुणींसाठी आदर्श बनली आहे. तिचा आत्मविश्वास आणि ध्येयवेड्या प्रवृत्तीमुळे ती भविष्यात उत्तम डॉक्टर्सपैकी एक ठरेल,” असे मत यावेळी मितेश पवार यांनी मांडले. मनालीसारख्या गुणवंत विद्यार्थिनीमुळे समाजात शिक्षणाची आणि चिकाटीची नव्याने प्रेरणा मिळत असल्याच मनोगत उपस्थितांनी व्यक्त करीत तिला पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. मंगळवार पेठ, कोकाटे गल्ली परिसरात राहणाऱ्या मनाली हिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *