मिरजमध्ये काँग्रेसला भगदाड ; अनेक पदाधिकारी जनसुराज्य शक्ती पक्षात

0
WhatsApp Image 2025-04-13 at 7.46.36 PM

जनसुराज्य शक्ती पक्षाचा लवकरच भव्य मेळावा घेणार-समित कदम

मिरज (प्रतिनिधी)

मिरज पूर्व भागात काँग्रेसला भगदाड पडले असून वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत असलेले पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत. मिरज तालुक्यातील अनेक सत्ताधारी आणि आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांनी जनसुराज्य मध्ये प्रवेश केला. यात सोनी आणि करोलीएम येथील काँग्रेस पक्षाचे नेते भानुदास पाटील, सोनी गावचे माजी उपसरपंच दीपक कांबळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नयन लोखंडे, समवेत रोहित सौंदडे, अनिल सौंदडे, अनिल कांबळे, सुशील कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू असून त्याच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना न्याय दिला जाईल तसेच लवकरच जनसुराज्य शक्ती पक्षाचा भव्य मेळावा घेणार असल्याचे सूतोवाच समित कदम यांनी केले आहे.

यावेळी मिरज ग्रामीणचे नेते अरविंद पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष आनंदसागर पुजारी, डॉ. पंकज म्हेत्रे, जयसिंग तात्या चव्हाण, सुरेशआबा इंगोले, विनायक शेरबंदे, विनायक रुईकर यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *