मिरजमध्ये रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात

0
1001360733

समितदादा कदम मित्र मंडळ आणि समीर भाई मालगावे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम 

मिरज (प्रतिनिधी)

मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त मिरज येथे रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. एमआयडीसी कुपवाड रोड येथील महाराष्ट्र लॉन येथे समीतदादा कदम मित्र मंडळ आणि समीर भाई मालगावे मित्र मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रमजान महिन्यातील रोजा हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. ईश्वर एकच असून आपण सर्व त्याचेच अनुयायी आहोत आणि सर्वांनी एकत्रितपणे सुख, समाधान व बंधुभावाने जीवन जगावे, असा संदेश प्रत्येक धर्म देतो. मिरज शहरातही अनेक वर्षांपासून हिंदू–मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून विविध धार्मिक सणांमध्ये परस्पर सहभाग घेण्याची परंपरा कायम आहे. त्याच भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रोजा इफ्तार कार्यक्रमात दोन्ही समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे स्वागत आयोजक समीर मालगावे यांनी केले. यावेळी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी, जनसुराज्य शक्ती पक्षाचे राज्य युवा प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, नगरसेविका बिल्कीस बुजरुक, दस्तगीर कुपवाडे, रणजीत चव्हाण, कय्युम नदाफ, परवेज गोलंदाज, राजीव वजीर (वड्डी), मेहबूबअली मणेर, महंमद जाफर मुजावर, मौलाना इर्शाद शेख, मोहसीन शेख, तनवीर बागवान, जमील बागवान, महंमद मणेर, आयाजभाई नायकवडी यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू–मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *