सयाजी समूहाची सांगलीत एन्ट्री ; ‘एफोटेल बाय सयाजी’ हॉटेल सुरू

0
1005471222

मिरज (प्रतिनिधी)

सयाजी हॉटेल समूहाने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ या नव्या व्यवसाय-केंद्रित हॉटेलची सुरुवात केली आहे. सांगली–मिरज रस्त्यावरील शिव आर सिटी मॉल येथे उभारण्यात आलेले हे हॉटेल पश्चिम महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रासाठी महत्त्वाची भर मानली जात आहे.

व्यापार आणि शेती या दोन्ही क्षेत्रात भक्कम ओळख असलेल्या सांगली शहरात दर्जेदार ब्रँडेड राहण्याच्या सुविधेची कमतरता अनेक वर्षांपासून जाणवत होती. या पार्श्वभूमीवर सयाजी समूहाच्या या नव्या हॉटेलमुळे व्यावसायिक प्रवासी, पर्यटक तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यांना आधुनिक आणि सोयीस्कर निवासाची सुविधा मिळणार आहे.

या हॉटेलमध्ये एकूण ५९ आधुनिक व सुसज्ज खोल्या असून त्या वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहेत. जेवणाची सोय म्हणून येथे दिवसभर सुरू असलेले ‘द क्यूब’ हे उपहारगृह तसेच ‘गुड ओल्ड डेज’ नावाचा बार उपलब्ध आहे. याशिवाय ‘जार्डिन १’ आणि ‘जार्डिन २’ अशी दोन बहुउपयोगी सभागृहेही तयार करण्यात आली असून बैठका, परिषद, प्रदर्शन तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

सांगली हे द्राक्ष उत्पादन आणि हळदीसाठी प्रसिद्ध असलेले समृद्ध कृषी व व्यापारी केंद्र आहे. शहराचे स्थानही सोयीचे असून कोल्हापूर, चांदोली राष्ट्रीय उद्यान, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य तसेच नरसोबाची वाडी आणि औदुंबर ही पर्यटन व तीर्थस्थळे जवळ असल्यामुळे या हॉटेलला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत सयाजी हॉटेल्सचे सहायक महाव्यवस्थापक राजेंद्र जोशी यांनी सांगितले की, सांगलीसारख्या आर्थिकदृष्ट्या सक्रिय शहरात दर्जेदार ब्रँडेड आदरातिथ्य सुविधेची उणीव होती. ‘एफोटेल बाय सयाजी’मुळे ही कमतरता काही प्रमाणात भरून निघेल आणि त्यामुळे पर्यटन तसेच व्यवसाय क्षेत्रालाही चालना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *