वैभव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सव्वादोन लाख रूपये बक्षीसांची”वैभव केशरी” बैलगाडी, घोडागाडी शर्यती

आष्टा प्रतिनिधी/(डॉ. तानाजी टकले)
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राजाराम शिक्षण संस्थेचे चेअरमन, आष्टा नगर पालिकेतील सत्ताधारी शहर विकास आघाडीचे नेते वैभव विलासराव शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा करण्याचा निर्णय वैभव दादा शिंदे युवा मंच कार्येकर्त्यांच्या बैठकीत झाला. वाढदिवसानिम्मित हार बुके आणू नयेत या ऐवजी शालोपयोगी साहित्य स्वीकारले जाईल असे आवाहन मंचने केले आहे.
वाढदिवसानिम्मित दोन लाखाहून अधिक रुपये बक्षीसांच्या”वैभव केसरी” जनरल गट, ब गट,बैलगाडी शर्यती, घोडागाडी शर्यतीचे, वृक्षारोपण,रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता.18) एप्रिल रोजी वैभव शिंदे यांचा वाढदिवस होत आहे. वैभव शिंदे हे आष्टा येथील माजी आमदार,सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्व. विलासराव शिंदे यांचे चिरंजीव.वैभव शिंदे यांनी वाळवा पंचायत समितीचे उपसभापती म्हणून विध्यार्थीप्रिय, व लोकप्रिय निर्णय घेत उत्कृष्ठ काम पाहिले आहे. वैभव शिंदे आष्टा नगरपालिकेतील सत्ताधारी शहर विकास आघाडीचे नेतृत्व करतात. विकास आघाडीच्या माध्यमातून आष्टा शहरात त्यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत.आष्टा शहरात एसटी डेपो व्हावा, एम आय डी सी व्हावी यासाठी ते आग्रही आहेत.
स्वतंत्र आष्टा तालुक्याचा सातत्याने त्यांनी शासनाकडे प्रयत्न केले.त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत, शासनाने आष्टा शहरात अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी दिली. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे वैभव शिंदे जिल्हाध्यक्ष होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली. त्यांना अटक ही झाली होती. त्यांनी दोनशेहून अधिक आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे घेऊन समाजहीत जोपासले आहे.कोरोना काळात त्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून अनेक पॉझिटिव्ह रुग्णांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. वैभव शिंदे युवा मंचच्या वतीने वाढदिवसा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
वाढदिवसानिमित्त शुक्रवार (ता.18) एप्रिल रोजी वृक्षारोपण व.रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ता:19 एप्रिल रोजी आष्टा माळ नागाव रोड येथे सकाळीआठ वाजता दोन गटात घोडागाडीशर्यती होतील. विजेत्यास पाचहजार, तीनहजार, दोन हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी आष्टा माळ येथे अ गट, ब गट, नवतर व आदत अशा तीन गटात भव्य जनरल बैलगाडी शर्यती होणार आहेत.विजेत्यास वैभव केसरी ‘किताबासह खालीलप्रमाणे बक्षीसे आहेत.
जनरल अ गट
प्रथम क्रमांक- 55,555 रु.द्वितीय क्रमांक- 35,555 रु.
तृतीय क्रमांक- 25,555 रु.
ब गटासाठी
प्रथम क्रमांक- 25,555 रु.
द्वितीय क्रमांक- 15,555 रु.
तृतीय क्रमांक- 11,555 रु.
नवतर व आदत गटासाठी
प्रथम क्रमांक- 11,555 रु.
द्वितीय क्रमांक- 7,555 रु.
तृतीय क्रमांक- 5,555 रु.
बक्षिसे आहेत.वैभव दादा शिंदे युवा मंचचे अमर शेळके,दीपक थोटे, अमोल पाटील, अभिषेक शेळके, संयोजन करीत आहेत.