मिरजेच्या शासकिय तंत्रनिकेतनला एन. बी. ए. मानांकन

0
WhatsApp Image 2025-04-16 at 9.26.43 PM

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)

शासकीय तंत्रनिकेतन, मिरज या संस्थेच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग (यंत्र अभियांत्रिकी) या अभियांत्रिकी विभागाच्या, पदविका अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड ऑफ अक्रीडिटेशन (NBA), नवी दिल्ली यांचे समितीकडून तीन वर्षासाठी म्हणजे २०२५ ते २०२८ साठी नुकतेच एन. बी. ए. मानांकन प्राप्त झाले. यंत्र अभियांत्रिकी पदविका शाखा ही सांगली जिल्ह्यातील प्रथम शासकिय संस्था म्हणून मानांकीत शाखा ठरली आहे अशी माहीती संस्थेचे प्राचार्य डॉ. संजय अर्जुनसिंग परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतन, मिरज या संस्थेच्या यंत्र अभियांत्रिकी या पदविका अभ्यासक्रमाच्या मानांकनासाठी नॅशनल बोर्ड ऑफ क्रीडिटेशन (NBA) नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने दिनांक २१,२२ व २३ फ्रेब्रुवारी २०२५ या तीन दिवसाच्या कालावधीत समितीने भेट देवून पहाणी केली होती. यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व उपलब्धता, टिचिंग लर्निंग प्रोसेस, रिसर्च अँड कन्सल्टन्सी, स्टुडंड सक्सेस रेट, करिअर गाइडन्स, प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, माजी विद्यार्थी प्रतिक्रीया, तज्ञ उद्योजक, आऊटकम बेस्ड एज्युकेशन याचे सर्वंकश मुल्यमापन केले. सदरच्या समितीमध्ये चेअरमन एन. आय.टी. वारंगळ येथील प्रोफेसर बाबुराव कोडळी व जामिया मिलिया विद्यापीठ दिल्ली येथील प्रोफेसर मोहंमद इम्रान खान या तज्ञांचा सहभाग होता. तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे येथील सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव विषेश सहकार्य लाभल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, कर्मशाळा अधिक्षक, अधिव्याख्याते, प्रबंधक, कर्मचारी यांनी हे मानांकन प्राप्त करणेसाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी संघटना, उद्योजक यांचा उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसादाने संस्थेला हे घवघवीत यश प्राप्त झालेचे परदेशी यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. सदर पत्रकार परिषदेस यंत्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एम. कुलकर्णी, एन. बी ए. संस्था समन्वयक डॉ. आर. एम. ओव्हळ, तसेच सर्व विभागप्रमुख, कार्यशाळा अधिक्षक व प्रबंधक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *