लग्न जुळण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विवाह संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करू- आ. सत्यजित देशमुख

0
WhatsApp Image 2025-04-17 at 10.05.49 PM

आष्टा प्रतिनिधी/(डॉ.तानाजी टकले)

वधू वर सूचकांना केंद्र व राज्य सरकारच्या सूक्ष्म व लघु उद्योजक यामध्ये समाविष्ट करून घेन्याबरोबरच लग्न जुळवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विवाह संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करू अशी ग्वाही आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र वधू वर सूचक संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात आ.सत्यजित देशमुख बोलत होते. भाजपाचे सम्राट महाडीक अध्यक्षस्तानी होते.

पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख जयवंतराव शिंदे उपप्रमुख अधिकराव पाटील , सौ नीता पाटील,सांगली जिल्हाध्यक्ष महादेव कुंभार, उत्तम कदम ,बाळकृष्ण ताटे, शंकर शिंदे, राजेंद्र पवार ,सतीश पाटील, धनाजी पवार,सुभाष कोळी, प्रमुख उपस्थित होते.

सम्राट बाबा महाडिक म्हणाले, शासनाकडून वधू वर सुचक मंडळाना मदतीसाठी प्रयत्न करू. वधू वर संघटनेच्या संघटनेच्या पाठीशी कायम उभा राहीन. कोणतीही अडचण उद्भभल्यास सर्व प्रकारची मदत करू. महादेव कुंभार म्हणाले, सध्या लग्न जुळवणे, योग्य स्थळ साधने जिकिरीचे झाले आहे मात्र संघटनेच्या माध्यमातूम अवघड काम सोपस्कर होतं आहे. अपेक्षिताना वधू वर संघटना सामाजिक बांधिलकीतून महत्वपूर्ण योगदान देत आहेत. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून २५२ वधू वर सूचक केंद्र संचालक आणि हजेरी लावली सर्वांना ओळखपत्र प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात आले.

पंजाबराव पवार आप्पा म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात ही वधू वर सूचक संघटना कार्य करीत आहे मोठ्या संख्येने संघटित होऊन सर्व वधुवर सुचक यांनी सहकार्य करावे . यावेळी उपाध्यक्ष संग्राम सिंह यादव खजिनदार प्रदीप जगताप संघटनेचे महासचिव अमृतराव देसाई, दत्तात्रय जाधव, ज्योतीताई सूर्यवंशी प्रतापराव पाटील ,जयवंतराव शिंदे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *