मिरजेतील बाल विद्यालयाचे विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेतील समता शिक्षण मंडळ संचलित बाल विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन शताब्दी व टी.एस.सी. परीक्षेत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. मंथन स्पर्धा परीक्षेत शाळेतील इयत्ता दुसरी मधील म.अली येळावीकर, अरफा सनदी, शताब्दी स्पर्धा परीक्षेत इयत्ता चौथी मधील इकरा बेपारी, श्रेया कोळी, नम्रता येसूमाळी, आलिया शेख, दिव्या किनीकर, मरियम लांडगे, मंदार बुरजे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
टी.एस.सी.स्पर्धा परीक्षेत इयत्ता पहिलीतील आरोही कोळी, स्वरा कोकाटे, कोमल तेजूमाळी, इयत्ता दुसरी मधील गौरी बरगाले, आरोही गोंधळी, म.अली येळावीकर, आयेशा बारगीर, अरफा सनदी, ईफत मुजावर, काव्या माळी, अनम जातकर, मसीरा कोतवाल, सबीया शेख, शिफान पिरजादे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. इयत्ता तिसरी मधील मोईझ मलिदवाले, सुफियान लांडगे, दिव्यश्री धुळूबुळू, अरमान बेपारी, वरद बरगाले, इनाया मुजावर, जबिना मुश्रीफ, माहीन जातकर, ईश्वरी परीट, सागर परीट, अरफा मुल्ला, सुफियान बेपारी, इम्रान गवंडी, इकरा कोतवाल, भाग्यश्री परीट, विक्रांत गोसावी या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले.