पहलगाम गोळीबार घटनेचा मदनी चॅरिटेबल ट्रस्टकडून निषेध

दहशतवाद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
सांगली (प्रतिनिधी)
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या 27 पर्यटकांवर गोळीबार करून त्याना ठार मारले गेले. मदनी चॅरिटेबल ट्रस्टने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना याबाबतचे निवेदन सादर करीत सदर घटनेबद्दल निषेध नोंदवला. त्यांनी पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती फाडून आपला संताप व्यक्त केला.
पाकिस्तान हा देश दहशतवाद्याना पाठीशी घालत आहे. यापूर्वी देखील अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. आपल्या लष्करच्या जवानांवरही गोळीबार केला आहे.वारंवार कुरापती काढून निष्पाप पर्यटकांना ठार मारण्याची ही कृती पाकिस्तानचा पाठिंबा असल्यानेच केली जात आहे.त्यामुळे भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन त्यांचा साक्षमोक्ष लावावा अशी या मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्या नंतर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन ट्रस्टने आपला निषेध नोंदवला.
यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफीयान पठाण, कुपवाडचे शफीक बुराण, हुजेफा नदाफ, मौलाना अजहर, अब्दुल गफार, आदम नदाफ, अजरुद्दीन सय्यद, फजल पठाण, साकीब मुजावर, मौलाना जुबेर जमादार,साद जमादार, सलीम शेख, मुफ्ती सद्दाम मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.