आरग येथे माळी कुटुंबीयांची आ.खाडे यांनी घेतली सांत्वनपर भेट

0
IMG-20250428-WA0024

मयताच्या कुटुंबियांना चार लाख रुपये शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन

मिरज (प्रतिनिधी)

मंगळवार (दि.२२) रोजी सायंकाळी तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा वारा येऊन गारपीट झाली होती. यावेळी अंगावर वीज पडल्याने उदय विठ्ठल माळी (वय ३३, रा. आरग) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. माजी पालकमंत्री व मिरजेचे आमदार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी आरग येथे जाऊन माळी कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन करून विचारपूस केली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले व माळी कुटुंबियांना मानसिक धीर दिला.

या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असून सर्वतोपरी मदत करू असे आ.खाडे यांनी सांगितले. घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी माळी कुटुंबियांना दिले. याप्रसंगी कृषी अधिकारी सूर्यवंशी, प्रतीक पवार यांच्यासह आरग येथील माजी उपसरपंच सुभाष माळी, किरण पाटील, नारायण माळी, माजी उपसरपंच उत्तम पाटील, संजय नागठाणे यांच्यासह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *