शिक्षणासारख्या उदात्त व्यवसायातून चांगली पिढी घडविण्याचे कार्य उल्लेखनीय – यु. के. सतीश

0
IMG-20250428-WA0023 (1)

मिरज (प्रतिनिधी)

शिक्षणासारख्या उदात्त व्यवसायातून चांगली पिढी घडविण्याचे कार्य उल्लेखनीय आहे. चांगले ज्ञानदान करून भविष्यामध्ये आपण चांगले नागरिक बनवत आहात हे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन यु. के. सतीश सहा (केंद्रीय आयुक्त जी. एस. टी.) यांनी केले ते खंडेराजुरी येथील रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरी अकॅडमी येथे एकलव्य अकॅडमीच्या आदर्श शिक्षक , आदर्श तंत्रस्नेही व समाजरत्न पुरस्कार वितरना वेळी बोलत होते.

यावेळेस जीएसटी अधिकारी राजेंद्र मेढेकर म्हणाले की, सध्या तंत्रज्ञानामध्ये वेगेवेगळे बदल होत आहेत. अनेक पर्याय मानवा पुढे आहेत. यातील कोणता पर्याय निवडावा हे शेवटी मानवाच्या हातात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा चांगले वाईट ठरवण्यासाठी मानवी बुद्धी वापरून आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल याचे ज्ञान संगणक क्षेत्रातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे.

एकलव्य अकॅडमीने सामाजिक क्षेत्र, आदर्श शिक्षक व आदर्श तंत्रस्नेही शिक्षक या विभागामध्ये पुरस्कार प्रदान केले. समाजरत्न विभागामध्ये सोमनाथ घाडगे, अजित हाळीगळे , संजय दिघे, बिस्मिल्लाह मुलाणी तसेच आदर्श तंत्रस्नेही विभागामध्ये अविनाश जाधव, महादेव सुतार, सिद्धेश्वर भोसले, मोहन मगदूम, संतोश वायफळे , हर्षा पाटील, चेतन कांबळे, संदीप जाधव, शारदा तवटे, प्रशांत सावंत, धनश्री राक्षे, राहुल खवाटे, किशोर शिंदे व आदर्श शिक्षक विभागामध्ये प्रकाश भंडारे, अनिल शिंदे, सुशीलकुमार कराळे, प्रदीप मानगावकर, हैदर पटेल, जितेंद्र डवरी, शीतल जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळेस एकलव्य अकॅडमीचे संस्थापक शहाजी शिंदे, रॉयल अकॅडमीच्या प्राचार्य डॉ. गीतांजली शिंदे व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दिलीप खरात, राम हंबरडे, प्रदीप पाटील, महेश पवार, आनंदा ढाळे, अमित पाटील, ओंकार चव्हाण, विकास गावडे, प्रमोद गेज्जी, अजय बाबर, निर्मला पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन हिना नदाफ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *