मिरजेत आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ केंद्राच्या विकासकामांचे भूमिपूजन

मिरज (प्रतिनिधी)
येथील प्रभाग क्र. ७ मध्ये वंटमुरे कॉर्नर जवळ आरवटगी पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात पेव्हिंग ब्लॉक्स बसविणे व संरक्षक भिंत बांधणे या विकासकामांचा शुभारंभ माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते शनिवारी सकाळी संपन्न झाला. या कामासाठी आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून या कामाची सुरवात आज करण्यात आली. यामुळे श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, माजी नगरसेवक गणेश माळी, माजी महापौर सौ. संगीता खोत, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, माजी नगरसेविका गायत्री कुल्लोळी, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, भाजप मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे, अभिजित गौराजे, मयूर नाईकवाडे, अनिता हारगे, भाजप पदाधिकारी बाबासाहेब आळतेकर, जयगोंडा कोरे, महेश धयारे , शशिकांत वाघमोडे, जितेंद्र ढोले, महेश फोंडे, गजेंद्र कुल्लोळी, विठ्ठल खोत, सूर्यकांत शेगणे, लतिका शेगणे, राजू माने, वैभव यमगर, अजिंक्य हंबर, उमेश हारगे, अनघा कुलकर्णी, रुपाली देसाई, रुपाली गाडवे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.