बोरगांव सर्कल रुंदीकरण-सुशोभीकरणासाठी 2 कोटी 50 लाखांचा निधी ः खास.जारकीहोळी

0
KPS_5467

बोरगाव,ता.24(प्रतिनिधी)-
गेल्या अनेक वर्षापासून बोरगाव सर्कलचे रुंदीकरण व सुशोभीकरण व्हावे ही शहरवासीयांची मागणी होती.या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाठपुरावा केला असता या सर्कल कामासाठी 2 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.या उपलब्ध निधीतून झालेल्या कामाचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.असून सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरणानंतर बोरगाव शहराला अधिकाधिक सौंदर्य प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी दिली.आज खास.प्रियंका जारकीहोळी,आम.शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत युवानेते उत्तम पाटील, बुडाअध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले, नगरसेवक शरद जंगटे यांच्यासह अन्यमान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना आम.शशिकला जोल्ले म्हणाल्या की, बोरगाव सर्कल रुंदीकरण ही काळाची गरज होती.यासाठी आपण जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे या कामाबाबत मागणी केली होती.आज या सर्वांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी निधी मंजूर झाला असून सर्कल डांबरीकरण व रुंदीकरणामुळे शहराला गत वैभव प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
उपलब्ध निधीतून सर्कल रुंदीकरणाबरोबर, डांबरीकरण होऊन रस्त्याच्या मध्यभागी हायमास्ट लॅम्प, कीर्तीस्तंभाचे सुशोभीकरण, सर्कल परिसरात 3.5 फूट फुटपाथ,यासह अन्य कामासाठी कामासाठी 2 कोटी 50 लाखांचा अनुदान मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी दिली.
याप्रसंगी युवानेते उत्तम पाटील,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले, बेडकीहाळच्या सुप्रिया पाटील, माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, नगरसेवक शरद जंगटे, माजी जि.पं. सदस्य राजेंद्र पवार, हालशुगर संचालक जयकुमार खोत,रामगोंडा पाटील, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील,अनुज हवले,विद्याधर अम्मन्नावर, भाऊसाहेब पाटील, नगरसेवक अभय मगदूम, राजू मगदूम, रोहित पाटील, तुळशीदास वसवाडे, मनोज पाटील, बाबासाहेब पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब सातपुते, मारुती निकम, जितेंद्र भोजे, अजित तेरदाळे, किरण रजपूत, यांच्यासह काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस सरकरचा निधी..कुणीही श्रेयवाद घेऊ नये ः चिंगळे
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, सर्कल रुंदीकरणासाठी काँग्रेस सरकारकडूनच 2 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे .त्यामुळे यात कुणीही श्रेयवाद घेऊ नये. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या कामासाठी वेळोवेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन निधीसाठी प्रस्ताव पाठवला होता. काँग्रेस सरकारकडूनच निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *