मिरजेत मराठा महासंघाच्या शिबिरास प्रतिसाद ; ५१ जणांचे रक्तदान, आरोग्य तपासणी

0
IMG-20250502-WA0016

मिरज (प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हा व मिरज शहर यांच्या वतीने दिनांक १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, आयुवेर्दिक आरोग्य तपासणी असे उपक्रम राबविले. नेत्र चिकित्सा, रक्तदान शिबीर, आयुवेर्दिक तपासणीमधे पोटाचे विकार व मणक्याचे विकार तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मिरज येथील डॉ. विकास पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे सलग तीन वर्षे हे विधायक उपक्रम चालू आहेत. या उपक्रमाचा सर्व नागरिक लाभ घेत आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत शिंदे, नेताजीमामा सूर्यवंशी, मिरज शहर अध्यक्ष श्रीधर जाधव, सतीश जाधव, मनोज जाधव, सामाजिक कार्यकर्ते व भाजप वैद्यकीय आघाडीचे मितेश पवार, अमोल पाटील, विजय शिंदे, महेश दाभाडे, अजिंक्य चिंचणे, विनायक ढेरे, राहुल आवळे, राजू कुरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी दान केले. आयुर्वेदिक आरोग्य तपासणीचा २५ नागरिकांनी लाभ घेतला. नेत्र तपासणी शिबिराचा ६० नागरिकांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *