हालसिध्दनाथ कारखान्यावर 11 ते 15 मार्च दरम्यान भव्य कृषी महोत्सव

0

युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांची माहिती

निपाणी,ता.27(प्रतिनिधी)-
बीडीसीसीचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी नेहमी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजनांना नेहमी प्राधान्य दिले आहे. गेल्या 30 वर्षात विविध योजना राबविताना शेतीचे उत्पन्नात वाढ आणि शेतकऱ्यांचा फायदा असा विचार केला आहे. मागील वर्षीपासून जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून हालसिध्दनाथ साखर कारखाना व बिरेश्‍वरच्या सौहार्दच्या सहकार्यांने भव्य कृर्षी उत्सव यशस्वीपणे पार पाडला. त्यामुळे यावर्षी भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन केले असून 11 ते 15 मार्च दरम्यान हालसिध्दनाथ कारखाना कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, मागील वर्षी बीडीसीसीचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाने 20 ते 25 दिवसात भव्य आयोजन करण्यात यश मिळाले होते. 250 हून अधिक स्टॉल आणि 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी कृषी उत्सवाला भेट दिली होती. लाखो रूपयांचा स्टॉलधारकांचा व्यवसाय झाला होता. यावर्षी 350 हून अधिक स्टॉल लावण्यात येत आहेत. शेती विषयक मार्गदर्शन, शेतीपुरक औजारे, वाहने, पिके, खते, पाणी योंजनांची माहिती, व्यावसायीक वाहने, दुचाकी व इतर वाहने, सजावट साहित्य, विविध वस्तूचे कपड्याचे खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मुलांच्या मनोरजनांचे खेळणी,पाळणे असे स्टॉल लागणार आहे. जनावारांचं भव्य प्रदर्शन होणार असून शेती मार्गदर्शन आणि संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.
हा कृषी उत्सव ना नफा ना तोटा या तंत्रावर आधारीत आहे. कारण या भागातील शेतीमध्ये प्रगती आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे हाच उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्हा.चेअरमन पवन पाटील बोलताना म्हणाले, बारामती, पुणें भागात भव्य कृषी प्रदर्शन भरविले जाते. सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मागील वर्षीपासून या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवून आपल्या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी बीडीसीसीचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी चेअरमन एम.पी. पाटील, संचालक विश्‍वनाथ कमते, आप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील, समित सासणे, विनायक पाटील, रावसाहेब फराळे, सुहास गुगे, श्रीकांत बन्ने, रमेश पाटील, आनंदराव यादव, आर. एल. चौगुले, देवाप्पा देवकत्तें, कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगांवे, कार्यालयीन अधिक्षक गजानन रामनकट्टी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व आभार जोल्ले ग्रुपचे संचालक विजय राऊत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *