दहावीत 90 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीटीईत मोफत प्रवेशःओंकार कुलकर्णी
चिक्कोडी (प्रतिनिधी)-
मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी परीक्षेत 90 टक्केहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चिक्कोडी सिटीई संस्थेच्या पदवीपूर्व महाविद्यालयात मोफत प्रवेश देणार असल्याची माहिती संस्थेची संचालक ओंकार कुलकर्णी यांनी दिली. ते येथील आर.डी. हायस्कूल व आर.एम. बालिका हायस्कूलतर्फे आयोजित शतप्रभा कार्यक्रमाच्या अध्यस्थानावरून बोलत होते.
यावेळी मंडळ पोलिस निरीक्षक व्ही. एस. चौगुला यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने अंगी बाळगावी. संयमाने त्यांची पूर्तता करण्याची अहवान केले. उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली म्हणाले,आर.डी.हायस्कूल ही कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात शिक्षणासाठी प्रसिद्ध संंस्था असल्याचे सांगून या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे व संस्थेचे नाव नावाजरुपाला आणण्याचे आवाहन केले.
यावेळी सीटीई संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.एस.मांजरेकर, संचालक एस.बी. कुलकर्णी,व्ही.पी.शेडबाळ,किरण कुलकर्णी,प्रशासकीय अधिकारी एस. जी. जहागीरदार, सहसचिव डॉ. मिथुन देशपांडे, संकेत मांजरेकर, एस. एस.खोत जी.पी.इनामदार,एच.एस. कुलकर्णी,आर.पी.दोडमनी यांच्यासह, शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते. उमा पत्तार यांनी अहवाल वाचन केले. एस. आर.दळवाई यांनी सूत्रसंचालन केले. तर सुधा हुद्दार यांनी आभार मानले.


