मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये बालआरोग्य शिबिर उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्रातील आरोग्यसेवेचे महत्वाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या मिशन हॉस्पिटल मिरज मेडिकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने “मोफत बालचिकित्सा आरोग्य तपासणी शिबिर मालिका” अंतर्गत विशेष बाल आरोग्य शिबिर पार पडले. या उपक्रमांतर्गत मिरजमधील न्यू इंग्लिश स्कूल येथील साधारणतः १४० शालेय बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली.
‘आरोग्य संपन्न पिढी व सक्षम भारत’ या संविधानिक संकल्पनेला हातभार लावण्याचा आमचा उद्देश असून, हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात येत असल्याची माहिती संचालिका डॉ. प्रभा कुरेशी यांनी दिली. शिबिरात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी परमशेट्टी, डॉ. इम्रान पुणेकर, डॉ. संतोष वाले, डॉ. काजोल आवळे व डॉ. तानाजी मोर यांनी मुलांची तपासणी केली. यावेळी फिजिओथेरपी विभागाचे विद्यार्थी व आरोग्य सेवक संध्या देवराज, अहिल्या भोरे, दीपमाला भोरे, मनिषा थोरे, संगीता पठाण, शुभांगी वारे, प्रशांत कांबळे, रूथ नांदे, स्मिता गायकवाड, नीलम चव्हाण, डेव्हिड सरोदे व पत्रकार युनूस बागवान यांनी सहकार्य केले.
या उपक्रमाच्या आयोजनात नानासाहेब वाघमारे, कामगार युनियन लीडर सतीश वायदंडे, पास्टर शशिकांत कांबळे, डॉ. गौतम प्रज्ञासूर्य, न्यू इंग्लिश स्कूलचे दिग्विजय चव्हाण सर, मुख्याध्यापक केंगार सर व इतरांनी मोलाचे योगदान दिले. सदर बालचिकित्सा तपासणी शिबिर मालिका ही प्रत्येक शनिवारी नियमितपणे राबवली जाणार असल्याचेही डॉ. प्रभा कुरेशी यांनी सांगितले.