स्वच्छतादूत राकेश दड्डणावर यांचा डॉ. एस. डी. भोमाज मेमोरियल पुरस्काराने सन्मान
मिरज (प्रतिनिधी)
येथील प्रख्यात शांतिसरोज नेत्रालयतर्फे देण्यात येणारा डॉ. एस. डी. भोमाज मेमोरियल २०२६ चा पुरस्कार हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त प्रख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ते स्वच्छतादूत राकेश दड्डणावर यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण पूरक क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग देणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार २०२६ पासून प्रदान करण्याची सुरुवात केली आहे.
मिरज येथील शांतीसरोज नेत्रालयाच्या प्रांगणात शनिवारी (दि.१४) रोजी झालेल्या छोटेखानी समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असते. सदर कार्यक्रमा प्रसंगी बोलताना शांतीसरोज नेत्रालयचे संचालक डॉ. शरद भोमाज यांनी राकेश दड्डणावर यांच्या कार्याचे सविस्तर वाचन व कौतुक करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी शांतीसरोज नेत्रालयचे डॉ. पूजा भोमाज यांनी सध्या वाढत असलेले ग्लोबल वॉर्मिंग व त्याचा आपल्यावरती होणारा दुरगामी परिणाम यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व राकेश दड्डणावर यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी इतर लोकांचे सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन रुग्णालयाचे व्यवस्थापक आशिष धोंगडे यांनी केले.


