जहीर मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

मिरज (प्रतिनिधी)
येथील सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या आदेशाने, जिल्हाध्यक्ष राजू भाई शिकलगार आणि कार्याध्यक्ष शहानवाज बशीर सौदागर यांच्या सहमतीने करण्यात आली.
जहीर मुजावर हे ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्यांनी पदभार स्वीकारताना सांगितले की, मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. कास्ट वेरिफिकेशन समिती आणि विद्यार्थी व पालक यांच्यात समन्वय साधून प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या वेळी मिरज तालुका अध्यक्ष अल्ताफ मुजावर, महापालिका क्षेत्र अध्यक्ष सादिक मुश्रीफ, कार्याध्यक्ष रशीद तारलेकर, उपाध्यक्ष जोहेब मुल्ला, सचिव मुनीर मुल्ला, खजिनदार मोहम्मद आशरफ सौदागर, सांगली शहराध्यक्ष वसीम बलबंड, मिरज शहराध्यक्ष यासीन शारीक मस्लत आदी मान्यवर उपस्थित होते. जहीर मुजावर यांना नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.