कारदग्यातील मा.जि.पं.सदस्या सुमित्रा उगळेसह शेकडोजणांची भाजपमध्ये घरवापसी
ढोणेवाडी,ता.1(प्रतिनिधी)-
कारदगा येथील माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सुदीपसिंह उगळे, माजी उपाध्यक्ष किरण टाकळे, रणजीत कदम, निवदूत धनगर, आप्पासो खोत, शरद आकुर्डे यांच्यासह अन्य शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जिल्हा बैंक अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, हालशुगर चेअरमन एम पी पाटील, आप्पासाहेब जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत घरवापसी केली. पुन्हा भाजपमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.हा घरवापसी, हळदी कुंकू व होममिनस्टर कार्यकम उत्साहाने पार पडला.
प्रारंभी छ. शिवाजी महाराज पुतळ्यास आण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कार्यक्रम स्थळी मान्यवरांना मिरवणुकीने आणण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सुदीपसिंह उगळे यांनी केले
जिल्हा बँक अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुमित्रा उगळे, सुदीप उगळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केल्याबद्दल या सर्वांचा सत्कार करून त्यांना भाजपच्या वतीने शुभेछा देण्यात आल्या.
सुमित्रा उगळे म्हणाल्या, आम्ही पूर्वी भाजपमध्येच होतो पण काही कारणास्तव भाजप सोडली होती.पण आम्ही पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करत आहोत हे फक्त आण्णा वहिनीच्या प्रेमापोटी व गावच्या विकासासाठी असून इथून पुढे आण्णा वहिनी जी जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सांगितले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले म्हणाले सुमित्रा उगळे व त्यांचे सहकारी पहिल्यापासून भाजपचे व आमचे निष्ठावंत कार्यकर्ते होते इथून पुढेही आमचेच आहेत. आज त्यांनी परत आमच्याकडे आल्याबद्दल समाधान वाटत असुन पुन्हा सर्वजण एकदिलाने गावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले .
आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या आण्णासाहेब जोल्ले पहिल्यांदा निवडणुकीस राहिले तेव्हापासून सुमित्रा उगळे आमच्या बरोबरीने काम केल्या. आता गैरसमज दूर झाल्याने त्या आमच्यासोबत पुन्हा आल्या आहेत.त्यामुळे भाजपला बळ मिळाले आहे.
यावेळी निपाणी ग्रामीण भाजप अध्यक्ष बाळासाहेब कदम, हालशुगर चेअरमन एम.पी पाटील, संचालक आप्पासो जोल्ले, समित सासणे, सुहास गुगे, प्रकाश शिंदे शरद जंगटे, देवाप देवकते, श्रीकांत बन्ने, राजू भदरगडे, अरविंद खराडे, नितेश खोत, आत्ताउल्ला पटेल, यशवंत गावडे, वीरेंद्र माने यांच्यासह कारदगासह निपाणी भागातील भाजप कार्यकर्ते व कारदगा येथील ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी घेण्यात आलेला हळदी कुंकू व होममिनिस्टर स्पर्धेत प्रथम रोहिणी खामकर, द्वितीय पायल नाईक, तृतीय विद्या गावडे, चतुर्थ जयश्री वुडके व पंचम सोनाली खामकर यांनी बक्षीस पटकावले रोहिनी बसन्नावर यांनी निवेदन केले. यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


