ज्ञानेश्वर वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

0
ज्ञानेश्वर वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

ज्ञानेश्वर वाचनालयाची अमृतमहोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल

सरूड, (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथे अमृतमहोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या आणि वाचन संस्कृती रुजविणाऱ्या श्री ज्ञानेश्वर वाचनालय यांच्या वतीने थोर साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      या दिनाचे औचित्य साधून वाचनालयातर्फे हस्ताक्षर, चित्रकला, निबंध व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ याच दिवशी सायंकाळी सरूडची ग्रामदेवता निनाई मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

  या कार्यक्रमावेळी नुतन जिल्हा परिषद सदस्य मा. अमरसिंह पाटील तसेच पंचायत समिती सदस्या डॉ. धनश्री पाटील यांचा वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वाचनालयाच्या अध्यक्षा सौ. अनुराधा पाटील, सरपंच भगवान नांगरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबासो पाटील, वाचनालयाचे संचालक विलास पाटील, चिटणीस दत्तात्रय पाटील, लिपिक संजय काटकर यांच्यासह ग्रामस्थ, वाचक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 स्पर्धांचे परीक्षण  आर. के. रोडे-पाटील, दीपक शेटे, विकास नांगरे-पाटील, अशोक परीट व रवींद्र आपटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल संभाजी पाटील यांनी मानले. वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल परिसरातून कौतुक होत असून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *