मिरजेत हृदय बंद पडलेल्या महिलेस सीपीआरद्वारे जीवदान

0
WhatsApp Image 2025-08-02 at 10.01.18 AM

स्पंदन रुग्णालयाच्या डॉ.रियाज मुजावर व टीमकडून महिलेला वाचवण्यात यश

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत हृदयविकारामुळे हृदयाची हालचाल पूर्णपणे बंद होऊन हृदयाचे ठोके बंद झालेल्या महिला रुग्णास सीपीआरद्वारे जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मिरजेत हृदयरोगावरील अत्याधुनिक उपचारांसाठी नव्याने सुरू होत असलेल्या स्पंदन रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यात आले. हॉस्पिटलचे संचालक हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर, डॉ. योगेश जमगे, डॉ. अमित जोशी, डॉ. सचिन गाडवे यांनी याबाबत माहिती दिली.

दि.२३ जुलै रोजी ही घटना घडली. हृदयविकाराचा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मालगाव येथील शिक्षिका असलेल्या अर्चना संतोष वायफळे (वय ३८) या उपचारांसाठी स्पंदन रुग्णालय येथे आल्या होत्या. प्राथमिक उपचार करत असतानाच त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. डॉक्टरांनी तपासणी केली असता रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने त्यांचे हृदय पूर्णपणे बंद झाल्याचे समोर आले. त्यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी तातडीने सीपीआर देण्यास सुरुवात केली परिणामी सदर महिलेचा जीव वाचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *