मालगाव येथील विविध विकासकामांचे आ. डॉ. सुरेश खाडेंच्या हस्ते उद्घाटन

मिरज (प्रतिनिधी)
मालगाव (ता.मिरज) येथील विविध विकासकामांचे उद्घाटन गुरुवारी (दि.१) रोजी माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्पूर्वी आ.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मालगाव येथील मातंग समाज मंदिर येथे उपस्थित राहून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली
उदघाटन झालेल्या विकासकामांमध्ये वॉर्ड क्रमांक १ मधील ५० लाख इतक्या मंजूर निधींची कामे आहेत. यामध्ये ढोर चर्मकार वसाहत सभागृह बांधणे 20 लाख, मातंग समाज व्यायामशाळा बांधकाम करणे २५ लाख, चर्चहॉल बांधकाम करणे ५ लाख इत्यादी कामांचा समावेश आहे. या कार्यक्रमास भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब अण्णा धामणे, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी विजय नाईकवाडे, भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.निलम मयूर नाईकवाडे, गटनेते शशिकांत कणवाडे, सतीश बागणे, तुषार खांडेकर, अशोक हुंळे, तुकाराम खांडेकर, महेश सपकाळ, महेश मोरे, अभिनंदन सलगरे, बाळासाहेब भाणूसे, हरीभाऊ कांबळे, राजू होणमोरे, यशवंत वानमोरे,अनिल कदम, प्रमोद सोनवणे, नाना धामणे, जगन्नाथ जोडरटी, बाहुबली कोथळे, आदिनाथ शेडबाळे, बंडू झळके, दत्ता खांडेकर, दादा भंडारे,सचिन भंडारे , रॉबर्ट भंडारे, विनोद आवळे,आनंदा भंडारे, पिंटू केंगारे व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.