मिरजेतील कन्या महाविद्यालयात राखी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

0
WhatsApp Image 2025-07-31 at 6.05.08 PM

मिरज (प्रतिनिधी)

येथील कन्या महाविद्यालात समाजशास्त्र विभाग व माजी विद्यार्थिनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “राखी प्रशिक्षण कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन सौ. सविता यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थिनी संघाच्या अध्यक्षा सौ. वनिता पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक भाषणातून कार्यशाळेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. राखी प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांमध्ये उद्यमशीलतेची भावना जागृत व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी राखी प्रशिक्षण कार्यशाळा ही केवळ एक सणापुरती कला शिकवणारी उपक्रम नसून, महिला सबलीकरणाचा प्रभावी माध्यम आहे. अशा उपक्रमांद्वारे महिलांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास आणि उद्योजकतेची भावना विकसित होते, जे दीर्घकालीन सामाजिक परिवर्तनास कारणीभूत ठरते, असे प्रतिपादन सौ. यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर हे होते. प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी अध्यक्षीय भाषणात राखी प्रशिक्षण कार्यशाळेचा महिला उद्यम विकासाशी असलेला संबंध अधोरेखित केला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर पाहुण्यांचा परिचय डॉ. विनायक पवार यांनी दिला. प्रमुख पाहुणे सौ. सविता यादव यांनी रक्षाबंधन सणाचे सामाजिक आणि भावनिक महत्त्व अधोरेखित करत महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राखी बनविण्याच्या कौशल्याचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेत विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या राख्या तयार करून आपले कौशल्य दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कोमल काळे यांनी तर आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गंगाधर चव्हाण यांनी केले. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सागर पाटील, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विनायक वनमोरे, प्रा. अभिनव औरदकर, तसेच लिटल आर्कीड इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती महाजन यांची उपस्थिती लाभली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *