राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रम

सांगली (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या ६४ व्या वाढदिवसा निमित्त सांगली व मिरज येथे बैलगाडी, घोडागाडी शर्यती, मतदान नोंदणी, होड्यांच्या स्पर्धा, क्रीडा विकास असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी सांगली जिमखाना येथे ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
स.७ वा. घोडागाडी व घोडेस्वारी स्पर्धा मिरज माळ येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. सचिव महेश साळुंखे व युवक राष्ट्रवादीचे अतुल भिसे संयोजक आहेत. स.९ वा. खणभाग सांगली येथे मतदान नोंदणी व मोफत कार्ड वाटप कार्यक्रम किशोर जगदाळे यांनी घेतला आहे. स. 8 ते दु. 12 वाजेपर्यंत मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी प्रा. पद्माकर जगदाळे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या ठिकाणी वसिम नायकवडी यांच्या तर्फे पद्माकर जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त 64 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
दु. १ ते २ वाजेपर्यंत कॉलेज कॉर्नर सांगली येथील अनाथ आश्रमामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्कर्ष खाडे व गणेश चौधरी यांनी आयोजित केला आहे. दु. 3 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मिरज अर्जुन वाडी येथील कृष्णा घाटावर भव्य वड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. महेश साळुंखे व अतुल भिसे यांनी या स्पर्धेच्या आयोजन केले आहे. सायं. ७ ते ७.३० वाजेपर्यंत सह्याद्री नगर मंगळवार बाजार येथे झिरो डाउन पेमेंट गाडी वाटपाचा कार्यक्रम प्रशांत माने यांनी आयोजित केला आहे. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत धनवंत बंगला विश्रामबाग येथे क्रीडा विकास फौंडेशन व एन्जॉय क्लब यांच्या वतीने क्रीडा विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.