रुकडीतील माने हायस्कूलमध्ये ऑनलाइन आदर्श निवडणुका उत्साहात

रुकडी (प्रतिनिधी):
लोकशाही प्रक्रियेची सखोल ओळख विद्यार्थ्यांना शालेय वयातच व्हावी, या उद्देशाने काकासाहेब माने हायस्कूल, रुकडी येथे पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने आदर्श शालेय निवडणुका उत्साहात पार पडल्या. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंतची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रचार यंत्रणा राबवली गेली, तर मतदानासाठी मोबाईल आधारित ई-व्हीएम प्रणाली वापरण्यात आली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
या उपक्रमामागे संस्थेच्या अध्यक्षा मा. खा. श्रीमती निवेदिता माने (वहिनीसाहेब), संस्था सचिव मा. खा. धैर्यशील माने (दादा) व अधीक्षक श्री गणेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक विनय कोतमिरे यांनी जबाबदारी सांभाळली.
मतदान केंद्राच्या प्रमुख पदांवर पुढील व्यक्तींनी काम पाहिले: मतदान केंद्राध्यक्ष: एम.एस. माने, संजय वारके, सौ. भारती मोरे, मतदान अधिकारी: विजय शिणगारे, अजहर पटेल, सी.के. माने, मोहसिन पटेल, मानसिंग पाटील, सौ. भाग्यश्री दीक्षित, श्रीमती रंजना कलकुटके निवडणूक निरीक्षक: अमर कांबळे, कीर्तिराज जाधव,
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरले, प्रचार केला, मतदान आणि मतमोजणी केली. त्यानंतर निकाल जाहीर करून विभागवार मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली आणि शपथविधीही पार पडला.
या उपक्रमात सर्व शिक्षकांनी सहकार्य करत विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची अनुभूती दिली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, संघटन कौशल्य आणि लोकशाही मूल्यांची समज अधिक दृढ झाली.