नाट्य परिषदेच्या एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रांजल डोंबाळे, पल्लवी लिगाडे प्रथम

0
WhatsApp Image 2025-08-07 at 10.31.30 AM

सांगली (प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सांगली उपनगर-२ तर्फे एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले होते. बामणोली येथील लोकमान्य टिळक वाचनालयात स्पर्धा झाली. बालगटात प्रांजल डोंबाळे, खुल्या गटात पल्लवी लिगाडे या दोघींनी प्रथम क्रमांक मिळवला. तब्बल ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. बालगट, खुलागट या दोन विभागांमध्ये स्पर्धा झाली. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दयानंद नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवाडी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर गडहिंग्लज, सातारा, पुणे आणि मुंबई येथून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. गोव्यातील निर्मला इन्स्टिट्यूटच्या प्रा. अनघा देशपांडे, नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य संदीप पाटील, माजी सरपंच सावळाराम शिंदकर यांच्या हस्ते उ‌द्घाटन झाले. कार्यक्रमाची सुरवात नटराजपूजन व दीपप्रज्वलनाने झाली. बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस पुरोहित, नाजनीन नायकवडी, वंदना गलगले, सुहास करंदीकर, मुकुंद करंदीकर, चंद्रकांत धामणीकर, मुकुंद पटवर्धन उपस्थित होते.

प्रा. अनघा देशपांडे यांनी स्पर्धकांना एकपात्री अभिनयातील विविध भूमिका प्रभावीपणे सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले. उदय आणि प्राची गोडबोले यांच्या माध्यमातून स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. या उपक्रमासाठी पुरोहित चेस अकॅडमी, वसीम नायकवडी यांनी विशेष सहकार्य केले. शाखेचे अध्यक्ष विनय देशपांडे यांनी सांगितले की, आगामी काळात अभिवाचन स्पर्धा, नाट्य प्रशिक्षण शिबिर, एकांकिका स्पर्धा, ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक रंगकर्मीनी शाखेचे सभासद होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन खुरपे (प्रमुख कार्यवाह), प्रदीप कुलकर्णी (उपाध्यक्ष), प्राची गोडबोल (उपाध्यक्ष), यशवंत कुलकर्णी (सह कार्यवाह), उदय गोडबोल, मकरंद कुलकर्णी, प्रसन्न कुलकर्णी, शहाबाज नायकवडी, युसुफ नदाफ, अमेय काळे, अथर्व खरे, सम्मेद कुदळे, सोमनाथ पवार, मयुरेश बडवे, आरजू मुल्ला शाखेच्या सभासद आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी तर परीक्षक म्हणून रवी कुलकर्णी, अनुप बेलवलकर, विशाल कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी यांनी काम पाहिले.

स्पर्धेचे विजेते (बालगट) : प्रांजल डोंबाळे (प्रथम), इरा जोशी (द्वितीय), स्पृहा सबनीस (तृतीय), उत्कर्षा गायकवाड, ऋतुपर्णा रामदासी, समर्थ सुतार (उत्तेजनार्थ).
खुलागट : पल्लवी लिगाडे (इचलकरंजी, प्रथम), पीयुष जामदार (कोल्हापूर, द्वितीय), वैष्णवी कुंभार (इस्लामपूर, तृतीय), उत्तेजनार्थ सोनाली मुसळे (इस्लामपूर), आर्या मोहिरे, विशाल कोळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *