रविंद्र वस्त्र निकेतनमध्ये ‘लाडकी बहिण रक्षाबंधन सेल’ला तुफान प्रतिसाद

महाराष्ट्र हादरवणाऱ्या ऑफर्स ग्राहकांच्या पसंतीस !
मिरज (प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि ग्राहकप्रिय वस्त्रदालन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रविंद्र वस्त्र निकेतन तर्फे रक्षाबंधननिमित्त ‘लाडकी बहिण रक्षाबंधन सेल’ मोठ्या धुमधडाक्यात सुरू झाला असून, पहिल्याच दिवसापासून ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. दि.४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुरू असलेला हा भव्य सेल रविंद्र वस्त्र निकेतनच्या सर्व शाखांमध्ये लागू असून, ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आणि दर्जेदार कपड्यांची खरेदी करण्याची पर्वणी लाभत आहे.
नेहमीच नावीन्यपूर्ण आणि आकर्षक ऑफर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या रविंद्र वस्त्र निकेतनने यावेळी आणलेल्या भन्नाट ऑफर्समुळे अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेला आहे. महिलांसाठी खास आकर्षण असलेली तक्षशिला पैठणी फक्त २१६ रुपयांत मिळत असून तिची मूळ किंमत ६०० रुपये आहे. याशिवाय क्रंची इंगस्टा ट्रेंड साडी – ४४१ रुपयांत, डोला सिल्क साडी – ३९६ रुपयांत, कल्याण सिल्क साडी – ६९३ रुपयांत, विशाल साडी – ७४९ रुपयांत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फॅशनेबल ग्राहकांसाठी लेडीज ट्रेडिंग कॉर्ड सेट – २९६ रुपयांत, थ्री पीस ड्रेस – ३९६ रुपयांत आणि कांजीवरम वन पीस ड्रेस – ९५४ रुपयांत देण्यात येत आहेत. या ऑफर्समुळे महिला वर्गात विशेष उत्साह दिसून येत आहे. पुरुष ग्राहकांसाठीही आकर्षक ऑफर असून, एक जेंट्स शर्ट खरेदी केल्यास एक मोफत अशी संधी ग्राहकांना मिळत आहे. त्यामुळे फॅमिली शॉपिंगसाठी रविंद्र वस्त्र निकेतन हे वस्त्रदालन एक आदर्श ठरत आहे. दररोज ग्राहकांची गर्दी वाढत असून, पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिवारासाठी सणासुदीच्या खरेदीचा आनंद रविंद्र वस्त्र निकेतनमध्ये अनुभवता येत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत.