ज्युबिली लायब्ररीस तत्परतेने सहकार्य करू : ना. सामंत

मिरज (प्रतिनिधी)
श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी, मिरज या संस्थेस महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा विकासमंत्री उदय सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. मिरजेत ९७ वर्षे कार्यरत असणाऱ्या या संस्थेस मंत्री उदय सामंत यांनी भेट दिल्यानंतर एवढी जुनी लायब्ररी पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश (बापू) आवटी यांनी स्वागत केले. मंत्री उदय सामंत यांनी संस्थेची पूर्ण विचारपूस केली.
राज्य शासनाच्या माध्यमातून या संस्थेस भविष्यात मराठी साहित्य जपण्यासाठी आणि पुढील पिढीला ते साहित्य जोपासण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून ‘पुस्तकाचे गाव’ या धर्तीवर तशा पद्धतीचा विभाग मिरजमध्ये सुरू करू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी शिवसेना नेते रवी माने, जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे, बजरंग (भाऊ) पाटील, किरणसिंह रजपूत, सुनीता मोरे तसेच संस्थेचे संदीप आवटी, निरंजन आवटी, महेश पाटील, श्रीकांत महाजन, महादेव यादव, सागर कोळी आदी उपस्थित होते.