मुलांना विकृत प्रवृत्तीपासून लांब ठेवून पोलिसांशी मैत्री करायला सांगा – प्रणील गिल्डा

मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन (सुरक्षा-वचनबंध) कार्यक्रम
मिरज प्रतिनिधी
माता-भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा, तसे केल्यास मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात मुले येणार नाहीत. आपल्या मुलांना चांगले वळण, चांगल्या सवयी लागणार असेल आणि त्यांच भवितव्य घडवण्यामध्ये उपयोग होणार असेल, अशाच व्यक्तींच्या संपर्कात मुलांना ठेवा, असे आवाहन मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी केले. मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “रक्षाबंधन (सुरक्षा-वचनबंध) हा कार्यक्रम” प्रसंगी प्रणील गिल्डा हे बोलत होते.
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या “पोलीस काका-पोलीस दीदी” व “पोलीस जनता-सुसंवाद” या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहेत. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी “रक्षाबंधन (सुरक्षा-वचनबंध) हा कार्यक्रम” आयोजन केले होते.
मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, उपनिरीक्षक विनोद शिंदे, उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चंदनशिवे, मिरज तालुकाध्यक्ष नीता आवटी, मिरज शहर अध्यक्ष शितल सोनवणे, नजमा मुल्ला, संध्या आवळे, नजमा मोमीन, राणी सावंत, सुजाता मोरे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी त्रिमुखे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते, शिक्षक शहाजान तांबोळी, सीमा कांबळे, शुभांगी वायदंडे, आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता हारगे, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव आणि अनिता पांगम, महिला कुपवाड शहराध्यक्ष प्रियंका विचारे, सांगली शहराध्यक्ष वैशाली धुमाळ, मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी, कागद संघटनेचे अध्यक्षा अश्विनी अनिल मोरे आणि मिरज शहरातील सामाजिक संस्था, तसेच महिला भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.