सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने अनोखे रक्षाबंधन

बेघर बांधवांसह पोलिस व सफाई कर्मचार्यांना बांधली राखी
मिरज (प्रतिनिधी)
महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरच्या वतीने सावली बेघर केंद्र सांगली येथील बेघर असलेले सर्व भाऊ, महात्मा गांधी चौकी पोलिस स्टेशन मधील पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि मिरज शासकीय रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांना आणि नर्सिंग स्टाफ यांना राखी बांधून आज रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ. संगीता हारगे म्हणाल्या की, बेघर केंद्रातील लोकांना राखी बांधण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. त्यांच्या सोबत काही काळ थांबुन त्यांच्या अडचणी समजावून घेता आल्या. महात्मा गांधी चौकी पोलिस स्टेशन मार्फत घेण्यात आलेल्या सुरक्षा रक्षा धागा या कार्यक्रमाचे महत्त्व देखील बहुमोल आहे. पोलिस बांधव नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि जातीय सलोखा राखण्यासाठी कोणतीही सुट्टी न घेता अहोरात्र काम करीत आहेत अशा पोलिस बंधुना सुद्धा राखी बांधून त्याना चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.
मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील सर्व सफाई कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफ यांना देखील राखी बांधून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमी सर्वसामान्य जनते सोबत राहण्यासाठी कटिबद्ध असल्याचे देखील त्यायावेळी म्हणाल्या. यावेळी महिला प्रदेश सरचिटणीस अनिताताई पांगम, सांगली महिला शहर अध्यक्ष वैशालीताई धुमाळ, मिरज महिला शहर अध्यक्ष शारदा माळी, कुपवाड महिला शहर अध्यक्ष प्रियांकाताई विचारे, मिरज कार्याध्यक्ष रईसाभाभी चिंचणीकर, दिपाली हारगे, सविता कोरे, फैरोजा जामदार यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.